क्या होता है ये सच?
दिग्दर्शक, लेखक, अभिनेता रजत कपूरला अस्तित्ववाद म्हणजे काय, सत्य नेमकं कशाला म्हणायचं, असे बरेच मूलभूत प्रश्न नेहमी पडत असावेत. कारण तो जो सिनेमा करतो, त्या प्रकारच्या सिनेमात हे प्रश्न वारंवार आपल्यासमोर येतात. रजतसारखी अनेक माणसं चटकन हार मानत नाहीत हे भारी आहे. पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार अशा गोष्टी आपल्यासारख्या लोकांसाठी 'मिथ्या' आहेत, हे त्याला फार लवकर आकळलं असावं!.......